नागपूर शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात एमडीच्या ४६ पदांमुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष कमी

Government Ayurved College Nagpur News : एकीकडे केंद्र सरकार ‘आयुष’च्या माध्यमातून आयुर्वेदाच्या प्रसार आणि प्रचाराकडे विशेष लक्ष देत आहे. मात्र प्रत्यक्षात राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयांवर अवकळा पसरली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये कपात करण्यात आली आहे. यात नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील एमडीच्या 46 जागा कमी झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष भडकल आहे.

राज्यात नांदेड, उस्मानाबाद, मुंबई, नागपूर आणि जळगाव अशी पाच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालये आहेत. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने महाराष्ट्रातील या सर्वच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांचे पोस्टमार्टम केले होते. आणि जागांमध्ये कपात केली होती. परंतु, राज्य शासनाने पाचही शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवीच्या 563 जागांसाठी कंत्राटीवर आयुर्वेद शिक्षक नेमले. मात्र पदव्युत्तर अर्थात एमडी (MD) अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे थांबवले. कंत्राटी प्राध्यापकांना एमडीचे विद्यार्थी मिळत नसल्याने आपोआपच या जागांवर संक्रात आली. नुकतेच नागपुरातील रसशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांची बदली जळगाव येथे झाली. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात असलेल्या रसशास्त्र विभागात तीन एमडीच्या जागांवर प्रवेश झाले नाही, तसेच 75 पैकी केवळ 29 एमडीच्या जागांवर प्रवेश होतील, अशी माहिती पुढे आली आहे.

राज्यभरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या 131 जागा झाल्या कमी

राज्यात पाच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात 249 एमडीच्या जागा आहेत. यापैकी 118 जागांवर प्रवेश करण्याची मंजुरी मिळाली. उर्वरित 131 जागा कमी झाल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष भडकला आहे. आयुर्वेदशास्त्रतील एमडीच्या 249 जागेवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ.रवींद्र बोथरा, डॉ.मोहन येंडे, डॉ. शांतीदास लुंगे, डॉ. राहुल राऊत यांनी केली आहे.

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

शासकीय आयुर्वेद मविद्यालयांमध्ये आवश्यक प्राध्यापक, सहायोगी प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापकांची पदे कंत्राटीने भरण्यात येत आहेत. कंत्राटी प्राध्यापकांच्या नावावर एमडीचे प्रवेश होत नाही. कायमस्वरूपी पदभरतीची उपाययोजना न केल्याने जागा कमी झाल्या आहेत. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे निमा स्टुडंट फोरमचे सचिव डॉ. राहुल राऊत यांनी सांगितले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

केंद्रीय कोळसा मंत्र्यांचे नाव वापरुन कोळसा उद्योजकाकडून एक कोटी रुपयांची मागणी; दोघांना बेड्या, दोघांचा शोध सुरु

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Source link

× How can I help you?