नियमांचे पालन करून कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन कार्यकर्त्यांनी कार्य केले पाहिजे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार
खडकी: केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही प्रचंड महागाई वाढली आहे. सामान्य जनता त्यात होरपळून चालली आहे तरी या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. हे सर्व आपणाला रोखायचे असल्यास आपल्यातूनच आपले नगरसेवक, आमदार तेथे गेले पाहिजे आणि तेच आपली बाजू मांडून आपल्याला न्याय देतील त्याकरिता कार्यकर्त्यांनी नियमाचे पालन करून कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन कामाला लागले पाहिजे असा विश्वास विरोधी पक्ष नेते नामदार अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.
शिवाजी नगर मतदार संघातील बोपोडी भागातील खडकी रेल्वे स्टेशन च्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस जन संपर्क कार्यालयाचे उदघाट्न माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप,महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी,उदयजी महाले,माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील, माजी नगरसेविकाअर्चनाताई कांबळे, गोविंद पवार,महेश हंडे,बाळासाहेब आहेर,कार्यक्रमाचे आयोजक वसुधाताई नीरभवने,अनिता पवार,संघटक दिलशाद अत्तार,अर्चनाताई वैद्य,रतनताई भंडारे,इंदुबाई गायकवाड,सतीश शहा,अमित जावीर,मा.स्वीकृत नगरसेवक करीमलाला शेख,सादिकभाई शेख,काँग्रेसचे राजेंद्र भुतडा,इंद्रजित भालेराव,प्रशांत टेके,साजिद शेख, ऍड.विठ्ठल आरुडे,मुस्कान शेख,निलेश रुपटक्के,शिवशेनेचे गोविंद निंबाळकर,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते तशेच या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मा.नगरसेवक श्रीकांतजी पाटील आणि कार्यक्रमाचे आयोजक वसुधाताई निर भवने यांच्या हस्ते अजित दादा पवार यांचा तथागत गौतम बुद्ध यांचे रूप देऊन सन्मान करण्यात आला.तसेच व्ही.जे.एन.टी.सेल च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष शशिभाऊ पांडुळे यांच्या हस्ते अजित पवार यांचा धनगर फेटा घोंगडी,घुंगराची काठी असा पारंपरिक पेहराव देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर सरचिटणीस विजय जाधव यांनी केले तर आभार राजन नीर भवणे यांनी मानले.