आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभा मधून उमेदवारी अर्ज भरला.

आम आदमी पार्टीने उच्च शिक्षित, जनसामान्यात वावरणाऱ्या, कसबा विधासभेत ३० वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आर्धी लढाई जिंकली आहे.



उमेदवारीचा अर्ज भरता वेळेस राज्य संघटक विजय कुंभार, मुकुंद किर्दत, अभिजित मोरे,  एकनाथ ढोले, सौ. विजया किरण कद्रे  आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किरण कद्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम आदमी चे अरविंद केजरीवाल यांनी जे काम जनसामान्यांसाठी काम केले आहे तसेच काम कसबा मतदार संघात केले जाईल असे सांगितले”.

विजय कुंभार “देशाचे मालक ही जनताच आहे, हेच आमच्या आमदारांच्या कामातून दिसेल. आम्ही पूर्ण ताकतिने प्रचार करणार आहोत, विजय आमचाच निश्चित आहे.”

उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

 

Recent Post

× How can I help you?