पिंपरी : औद्योगिक शुटींग हॉलीबॉल स्पर्धा २०२३ आयोजित

पिंपरी, दि. ७ फेब्रुवारी २०२३ :- औद्योगिक स्पोर्ट्स असोसीएशनच्या वतीने व फ्लॅश-इलेक्ट्रोनिक्स कंपनी यांच्या सहयोगाने ५९ वी औद्योगिक शुटींग हॉलीबॉल स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धा यमुनानगर निगडी येथील केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न झाली. सदरच्या स्पर्धेत एकूण १६ कंपनीचे खेळाडू व अधिकारी यांनी सहभाग घेतला होता.

५९ वी औद्योगिक शुटींग हॉलीबॉल स्पर्धच्या अंतिम सामन्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाने फ्लॅश-इलेक्ट्रोनिक्स या संघाबरोबर २-० अशी रोमहर्षक खेळीकरून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाकडून सुहास नाईक (कर्णधार), दशरथ वाघेरे (उपकर्णधार), सोमनाथ वीर, अंकुश लोहकरे, विजय गांगुर्डे, प्रशांत उबाळे , विनय जगताप , यांचे विशेष योगदान लाभले. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शुटींग हॉलीबॉल संघास क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांचे तसेच स्पर्धेस संघ मार्गदर्शक परशुराम वाघमोडे व संघ व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. फ्लॅश-इलेक्ट्रोनिक्स संघाकडून संजय बोऱ्हाडे व लव अंकुश यांची लढत अपुरी ठरली या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक सी.एफ.व्ही.डी. खडकी तर चतुर्थ क्रमांक डॉन फॉक्स इटन, पिंपरी या संघाने पटकाविला.

Recent Post

× How can I help you?