संगीत अकादमीतील विद्यार्थ्यांचा मासिक संगीत सभेचे शैक्षणिक उपक्रम व सांगीतिक कार्यक्रम

पिंपरी, १४ फेब्रुवारी २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग संगीत अकादमीतील विद्यार्थ्यांचा मासिक संगीत सभेचे शैक्षणिक उपक्रम व सांगीतिक कार्यक्रम दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाला उपस्थित निखील वाघमारे यांनी स्वतंत्र तबला वादन करीत तीनतालामध्ये कायदे, रेले, तुकडे चक्रधार तयारीने सादर केले, परीक्षित राठोड यांनी व्हायोलीन वर राग अल्हय्या बिलावल सादर केले आणि अपर्णा भोंडे यांनी ठुमरी सादर करीत कलाकारांनी रसिकांची मन जिंकली.

निमंत्रित कलाकार पंडित संजय गरुड व समीप कुलकर्णी याचं शास्त्रीय गायनात व सतारवादनात सहवादन झाले. त्यांनी राग मधुवंती मध्ये सुरुवातीला विलंबित तीनतालात बंदिश सादर केली. नंतर द्रुत तीनतालात सहवादनात गायनाची व सतारची जुगलबंदी करून या कार्यक्रमाला रंगत आणली.

तबल्यावर विनोद सुतार आणि हर्मोनीवर उमेश पुरोहित, मिलिंद दलाल यांनी साथ दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना समीर सूर्यवंशी यांनी केली. या कार्यक्रमासाठी संगीत अकादमीचे पर्यव्यक्षक अरुण कडूस व क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड संगीत रसिकांचा उल्हासदायी प्रतिसाद मिळाला.रसिकांच्या व विद्यार्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये बाजरी मुरलिया या भजनाणे कार्यक्रमाची सांगता झाली.

     क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक संगीत सभेचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पारपाडण्यात आला.

× How can I help you?