पुणे : सम्राटकरांच्या जाण्याने चळवळीला फार मोठा धक्का बसला आहे. लेखणीच्या द्वारे समाजात अभूतपूर्व क्रांती करणारे कमी संपादक आहेत त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर गेली 20 वर्ष सम्राट चालविण्याचे अवघड कामगिरी सम्राटकार बबनराव कांबळे यांनी पेलून धरली त्यांच्या जाण्याने वृत्तपत्र क्षेत्राची आणि चळवळीची मोठी हानी झाली अशा शब्दात चळवळीचे जेष्ठ विचारवंत वसंत साळवे यांनी आपली खंत व्यक्त केली.
पुणे शहराच्या वतीने सम्राट विचार मंच आणि विविध पक्ष, संघटना , संस्था आणि वाचकाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते.
त्या वेळी अध्यक्षीय भाषणात साळवे बोलत होते.
भन्ते हर्षवर्धन शाक्य, जेष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा, राष्ट्रीय प्रबोधनकार प्रा, दि. वा. बागुल, जेष्ठ पत्रकार अरुण खोरे, आर पी आय पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशालभाऊ शेवाळे, यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड, जेष्ठ वक्ते ताहिरभाई शेख, शंकर तडाखे, विवेक बनसोडे, डॉ. निशा भंडारे ज्योतीताई परदेशी,निर्मलाताई कांबळे, कांताताई ढोणे, शशिकलाताई कांबळे, विमल खांडेकर, विलास वनशिव, छोटू पिल्ले, शामराव गायकवाड, अंकुश साठे, भीमराव सोनवणे, मिलिंद माने. इत्यादी उपस्थित होते.कवी आणि गायक धेंडे यांनी आपल्या गायनातून अभिवादन करून सभेला सुरुवात करण्यात आली.माजी आमदार चळवळीचे विचारवंत ऍड. जयदेव गायकवाड आदरांजली वाहताना म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिशा देण्यासाठी वृत्तपत्रे सुरु केली तोच वारसा सम्राटकार कांबळे साहेबांनी जपला. आंबेडकरी चळवळीला पुढे नेणारा, आंबेडकर समाजाच्या हृद यासी संपर्क साधणारा संपादक म्हणून ते जनसामान्यात लोकप्रिय होते. सम्राट टिकविणे, सुरु ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. वर्तमान पत्राच्या आत्ता पर्यंतच्या इतिहासात 125 पानांचा अंक काढणारे एकमेव संपादक म्हणून बबनराव कांबळे सरांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. अशा शब्दात डॉ. जोगदंड यांनी आदरांजली वाहिली. डॉ. विलास आढाव म्हणाले बबनराव कांबळे हे तत्वनिष्ठ कृतिशील आणि स्वाभिमानी संपादक होते. समाजातील बुद्धिजीवना एकत्रित गुंफण्याचे काम सम्राट ने केले. अभिवादन सभेसाठी धम्मबंधू ऍड. एम बी तथा भाऊसाहेब वाघमारे, दिलीपदादा लगड, महेश कुरणे, ऍड. विद्याताई लोखंडे, विशालभाऊ शेवाळे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच संगीताताई आठवले यांनी सम्राट ला दहा हजार रुपये चा चेक, डॉ. आढाव यांनी रोख पाच हजार रुपये, अभिवादन सभेचे प्रास्ताविक दत्ता सूर्यवंशी. सूत्रसंचालन दीपक मस्के आणि आभार रामदास लोखंडे यांनी मानले”.