अन् अश्या प्रकारे शेवटी तो डी जे झालाच……

अन् अश्या प्रकारे शेवटी तो डी जे झालाच……
डी जे करियर करताना होणारी तरुणाची धडपड ची कहाणी
कॅम्प – पूर्वी फक्त उच्चशिक्षित , पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकारले ,अमराठी तरुण – तरुणींचा भरणा असलेल्या प्रतिष्ठित,वैभवसंपन्न कुटुंबातील नागरिकच डी जे या व्यवसायात आपले पाय रोवून संपूर्ण संगीत क्षेत्रातील मार्केट आपल्या ताब्यात ठेवत असेल , परंतु हर्षवर्धन साळवे या तरुणाने ही जुनी संकल्पनाच उलथून टाकत या क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे, तर अनेक नवीन तरुणांना देखील तो या आधुनिक संगीताच्या क्षेत्रात काम करताना संधी देऊन त्यांना आपल्या पुणे डी जे असोसिएशन संस्थेच्या माध्यमातून संरक्षणही देत आहे .


सध्या डी जे (डिस्क जॉकी) चा जमाना आहे, पूर्वीच्या, लग्न , मिरवणुका, आनंदोत्सवात वापरण्यात येणाऱ्या, ढोलीबाजा, नगारा, ढोलपथक, बेंजो पार्टी, आदी वादनाची जागा आता जिथे तिथे साऊंड ने घेतली आहे, आणि हा साऊंड वाजवणार वादक म्हणजे डी जे (डिस्क जॉकी) होय डी जे व्यवसायिक करियर म्हणून स्वीकारणे येथून १५ वर्षापूर्वी केवळ काही उच्च वर्गातील पाश्चिमात्य संस्कृतीची जोपासना करणाऱ्या तरुण तरुणींनी हक्काचा व्यवसाय होता, परंतु आज पुण्यातील नाना पेठ येथील पत्रा चाळ झोपडपट्टीत राहणाऱ्या हर्षवर्धन साळवे डी जे हर्ष याने गेल्या पाचाच वर्षात अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपने काम करत एक वेगळं नावलौकिक कमावले असून सध्या ती पुण्यातील डी जे असोसिएशन चा संस्थापक अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या काम करीत पुण्यातील अनेक लहान मोठ्या डी जे वर इव्हेंट मालक, साऊंड मालक, पार्टी ऑर्गनायझर, क्लब मालक यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढून त्यांना सन्मान आणि न्याय देण्याचा महत्त्वपूर्ण काम करीत आहेत.
हर्ष ची डी जे बनण्याची रोमांचक कहाणी –
पुण्यातील नाना पेठ येथील पत्रा चाळ झोपडपट्टीत हर्षद आपल्या आई वडील आणि दोन मोठे भाऊ यांच्यासोबत राहतो. लहान पणापासून हर्ष अभ्यासात अतिशय हुशार होता परंतु संगीताची त्याला खूप आवड होती, त्याखातिर त्याने तबला वादनाचे दोन परीक्षाही यशस्वीरीत्या पास केल्या होत्या , त्यामुळे तो तबला उत्तम वाजवतो. नववीत तो वडिलांना म्हणाला बाबा मला संगीतातल्या अत्याधुनिक डी जे क्षेत्रात करियर करायचे आहे,, त्यावेळी वडील म्हणाले दहावी चागल्या मर्कानी पास कर मी त्याला डी जे क्लास लावतो, स हर्ष दहावीला तब्बल ८३% गुण घेऊन यशस्वी झाला होता ,परंतु, अतिशय कष्टाळू, प्रामाणिक anai सरळ मार्गी असलेल्या हर्षवर्धन यांच्या वडिलांनी मुलाने या संगीत क्षेत्राचा नादच करू नये म्हणून त्याला टिळक रोड येथील अशोक महाविद्यालयात सायन्स विभागात प्रवेश मिळवून दिला .


परंतु, हर्ष चे तेथे मनच रमत नव्हते, सतत डी जे बनायचं ध्यास त्याचे पाठलाग करीत होता, ११वी ची अंतिम परीक्षा जवळ आली असता त्याच्या मित्राने हर्ष ला सांगितले भाऊ एकच मार्ग आहे तुला जे बनायचे आहे ते पेपर मध्ये लिही, डी जे च्या स्वप्नाने वेड्या झालेल्या हर्ष ने प्रत्येक पेपर मध्ये i want to be d j, i am not interested in study असे लिहलेले होते. वर्गशिक्षक ने हर्ष के पेपर मुख्याध्यापकांना दाखवले असता मुख्याध्यापकही आश्चर्य चकित होऊन हर्ष चे ते पेपर नोटीस बोर्ड वर लावले आणि हर्ष ला आणि त्याच्या वडिलांना लगेचच बोलून घ्या असे म्हणाले.


मुख्याध्यापक समोर येताच वडिलाची पेपर पाहून बोलतीच बंद झाली, वडील हर्ष कडे अतिशय रागाने बघू लागले मात्र मुख्याध्यापक समोर आसल्याने काहीच करता येईना हर्ष ने मला डी जे होऊन काय करायच आहे याचा आपल्या वहीत असलेला रोड म्यापच मुख्यध्यापकाकडे मांडून ठेवला असता मुख्यद्यपकाही चक्रावून गेले अतिशय लहान वयात मुलाला बेल्जियम ला टूमारो लांड हा प्रत्येक डी जे च्या आयुष्यातील सर्वोच्च इव्हेंट प्ले करायचा आहे असे हर्ष ने सांगितले असता शेवट मुख्याध्यापकच म्हणाले बाळ मी तुझे डी जे क्लास लावतो मी तुझी २५००० फी भरतो , पण तू शिक तू हुशार आहेस मी १२ वी ला प्रवेश देतो असे सांगितले, त्यावेळी हर्ष शिकण्यासाठी तयार झाला. घरी जात असता मग वडिलांनीच लाजत लाजत मी स्वतः तू झा डी जे च्या क्लास चे पैसे भरतो असे सांगितले आणि मग पुण्यातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध आर्टिस्ट असलेल्या सन्नी पूर्व कडे हर्ष ने क्लास लावला आणि तेथूनच त्याची डी जे च्या करियर ची सुरुवात झाली.
डिस्क जॉकी असोसिएशन पुणे ची स्थापना –


डी जे म्हणजे अतिशय शुल्लक कामगार असे त्याच्याकडे पाहण्याचा, कार्यक्रमाचे आयोजक, साऊंड मालक, इव्हेंट ऑर्गनायझर, क्लब चालक यांचा दृष्टिकोन होता, ही सर्व मंडळी लाखो ,हजारो रुपये एका शी मागे कमावत आहेत आणि याच्या कार्यक्रमाचा मुख्य आधार असलेला डी जे ला मात्र केवळ शे हजार रुपये फक्त दिले जात होते, अनेक डी जे चे पगार ऑर्गनायझर, आणि मालक थकवत आणि अश्या प्रकारे डी जे ची आर्थिक पिळवणूक अनेक वर्षापासून चालू होती, पार्टी ने पेमेंट नाही किया, अगले महिने देता हु, अभी पैसे नाही है अशी अनेक कारणे या डी जे ना पागारावेळी मिळत असे त्यामुळे स्वतः हर्ष देखील याच परिस्थितीतून गेला होता त्यामूळे, आयोजक आणि मालक यांची ही दादागिरी मोडत काढत हर्ष ने डिस्क जॉकी असोशिअशन पुणे चे स्थापना केली आणि या सर्व डी जे कामगारांना न्याय मिळून दिला, आज हर्ष च्या या धोरणात्मक संस्थेच्या स्थपनेमुळे डी जे ना कुठलही त्रास झाला तर हर्ष तत्काळ त्यांच्या मदतीसाठी धावून जातो. कारोना काळातही हर्ष ने आपल्या सभासदांना संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे

× How can I help you?