बोपोडीकर सम्राट वाचकांच्या वतीने अभिवादन सभा संपन्न

बोपोडी:चळवळीतील अग्रगण्य वर्तमान पत्र म्हणून गेली वीस वर्ष समाजाची धुरा वाहून अन्याय अत्याचार विरोधात जण सामान्यांना न्याय मिळून देण्या साठी सम्राटकार का. बबन कांबळे साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्चीले आणि समाजाला नवी दिशा तसेच बरेच काही देणे दिले आता त्यांच्या पाश्च्यात सम्राटला आपण दिले पाहिजे या उद्दिष्ठाने सम्राट वृत्तपत्राचा आर्थिक स्तर कसा उंचावेल या कडे वाचक वर्गाने लक्ष दिले पाहिजे असा निर्धार बोपोडी सम्राट वाचक आणि हितचिंतकांनीअभिवादन सभेत केला.
समस्त बोपोडीकर सम्राट वाचक, हितचिंतक आणि मराठवाडा बौद्ध परिषद इंद्रजित भालेराव,छोटू  पिल्ले यांच्या विशेष सहकार्यातून सम्राटकार का.बबन कांबळे साहेबांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी बोपोडी येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.सभेच्या अध्यक्षस्थानी वसंत कांबळे,प्रमुख उपस्थिती ऍड.रमेश पवळे, मा.नगरसेवक श्रीकांत पाटील,सत्तारभाई मिस्त्री,धम्मबंधू राजेंद्र शेलार, सम्राट विचार मंच कार्याध्यक्ष एच.एम.शिंदे,काँग्रेस सरचिटणीस विनोद रणपिसे,राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस विजय जाधव,धम्मक्रांती महोत्सव समिती मा. अध्यक्ष शामराव गायकवाड,राजेंद्र भुतडा,पत्रकार संजय आगरवाल,अनिल भिसे,मराठवाडा बौद्ध परीषद काशिनाथ गायकवाड,बुद्ध शासन सभा विकास चव्हाण,बाळासाहेब चोरघे, सादिकभाई शेख,मातंग आघाडी अध्यक्ष अंकुश साठे, बौद्धाचार्य दिलीप कांबळे, मनोहर शेलार,पुणे जिल्हा कला विकास अध्यक्ष गायक सुरेश गायकवाड,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष जीवन घोंगडे, बुद्धभूषण समाज मंडळ अध्यक्ष शशिकांत भालेराव,अरुणा चेमटे,बुद्ध शाशन सभा निशा मोहाळे,मराठवाडा मिलिंद महिला संघ अध्यक्षा चारुशीला भालेराव,वैशाली मांजरेकर, सविता गायकवाड, संपदा कांबळे, कुसुम कांबळे, शांताताई कांबळे,शकुंतला बनसोडे, चतुराबाई कांबळे,नंदा गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
सम्राटला आर्थिक देणगी देणारे डी. सि.एम. सोसायटी जनरल सेक्रेटरी विशालभाऊ शेवाळे 5000 रुपये, गोदाई प्रतिष्ठान अध्यक्ष विनोद रणपिसे रुपये 2000 रुपये, सम्राट विचार मंच एच एम शिंदे 500 रुपये, धम्मबंधू  राजेंद्र शेलार 500 रुपये, दत्ता सूर्यवंशी 500 रुपये आणि कांताताई ढोणे, सुहासिनी ढोणे, संगीताताई खंडागळे, संगम ढोणे यांच्या वतीने 1500 रुपये देणगी देण्यात आली. अभिवादन सभेचे सूत्रसंचालन कवी गायक इंद्रजित भालेराव यांनी केले.अभिवादन सभेसाठी संघमित्रा कला पथक दापोडी अध्यक्ष रमेश कांबळे, गायक शिवाजी भालेराव, ढोलकीवादक मारुती सूर्यवंशी, अनिल कांबळे, अभिमन्यू  कांबळे, मिलिंद माने यांनी विशेष परिश्रम घेतले

× How can I help you?