पुणे जिल्हा कलामंच अध्यक्ष पदी सुरेश गायकवाड यांची निवड, बोपोडी करांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुणे : महाराष्ट्रात नावाजलेली कलाकारांची संघटना म्हणून पुणे जिल्हा कला विकास महासंघाची ख्याती आहे. अनेक दिग्गज कलावंतांनी या संघटनेचे मानाचे अध्यक्ष स्थान भूषविले आहे. आणि संघटना नावा रुपाला आणण्यात मोठा वाटा उचलला आहे. या वर्षी होनहार गायक सुरेश गायकवाड यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सर्वांचे आवडते आणि आदरभाव करणारे गायक म्हणून गायकवाड दादा प्रसिद्ध आहे. त्यांच्या मार्फत कलावंत नेहमी आपली उद्दिष्ट गाठतील त्या साठी कलावंतांना शुभेच्छा देण्यासाठी बोपोडीतील धम्मक्रांती महोत्सव समिती, सम्राट विचार मंच आणि सर्व बोपोडीतील जाणकारक आणि कलावंतांच्या पाठीशी उभे राहणारे आंबेडकर चळवतील गायक आणि कवी इंद्रजित भालेराव, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे छोटू  पिल्ले, यांच्या वतीने गायक सुरेश गायकवाड यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी ऍड, रमेश पवळे सर, पत्रकार दत्ता सूर्यवंशी, सम्राट विचार मंच कार्याध्यक्ष एच एम शिंदे, समाजसेवक विजय जाधव, धम्मक्रांती महोत्सव समिती माजी अध्यक्ष शामराव गायकवाड,मराठवाडा बौद्ध परिषद अध्यक्ष वसंत कांबळे, धम्मबंधू  राजेंद्र शेलार, अंकुश साठे, काशिनाथ गायकवाड, संगीताताई खंडागळे, चारुशीला भालेराव, कांताताई ढोणे, कुसुम कांबळे, निशाताई मोहळे, अरुणाताई चेमटे, मुस्कान शेख, सुहासनीं ढोणे, चतुराबाई कांबळे आदी उपस्थित होते

× How can I help you?