प्लान इंटरनॅशनल व नवजीवन लोक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्मनाने दिनांक 14 मार्च 2023 रोजी भव्य असे पुणे युथ फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. सी पी अरुण, माननीय श्री गुरव साहेब(उप पोलीस निरीक्षक) व माननीय श्री योगेश खैरनार यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा डोलाई यांनी केले कार्यक्रमाचे आभार माननीय श्री किरण गायकवाड यांनी केले कार्यक्रमांमध्ये एकूण सक्षम प्रशिक्षणार्थी 500 विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सक्षम चा अनुभव सांगितला व भव्य असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते त्याच पद्धतीने सक्षम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय उपयुक्त असे साहित्य वाटप करण्यात आले प्रमुख पाहुण्यांपैकी माननीय श्री सीपी अरुण सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच माननीय श्री गुरु साहेब (पोलीस उपनिरीक्षक) यांनी सक्षम कार्यक्रमाची गरीब विद्यार्थ्यांना खूप गरज आहे असे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात चालले पाहिजे व त्याचा ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे त्याद्वारे ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील तसेच माननीय योगेश खैरनार यांनी वेळेबद्दल विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्लान इंटरनॅशनल चे कर्मचारी धनश्री धनेश्वर, पूजा डोलाई, वंदना रिंगणमोडे, रोहित सुरोशे, सौरव काकडे, उमा मगर अनमोल असे सहकार्य केले कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना सुरुची असे भोजनाची व्यवस्था प्लान इंटरनॅशनल करून करण्यात आली.