आदर्श शिक्षिका आशाताई शेवाळे यांच्या अभिवादन सभेत वैचारिक वारसा जपण्याचा निर्धार.
पुणे: दत्ता सूर्यवंशी. डी. सी एम सोसायटी च्या जडण घडण मध्ये अनेक महापुरुषांचा हातभार लागला आहे. हि संस्था मोठी करण्यामध्ये का. एम डी शेवाळे सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन मदतनिसाची भूमिका बजावणाऱ्या संचालिका आदर्श शिक्षिका आशाताई शेवाळे यांचा मौलाचा वाटा आहे. अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याऱ्या या मातेस अभिवादन करण्यासाठी महर्षी विद्यालय नाना पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशालभाऊ शेवाळे प्रमुख उपस्थिती आमदार सुनील कांबळे, माजी गृहराज्यमंत्री रमेशजी बागवे, संस्थेचे अध्यक्ष डी टी राजपूत, काजलताई शेवाळे, वर्षा पाटील, शिल्पा भोसले, सिध्दार्थ शेवाळे, यश शेवाळे, नितीन पाटील, उमेश भोसले, कर्नल आशिष धिंग्रां, भारतीय बौद्ध महासभा के व्ही मोटघरे, शिवसेना संपर्क प्रमुख अजय भोसले, वंचित नेते वसंत साळवे, अंकल सोनवणे, प्राचार्य जे के मस्के, उपप्राचार्य डॉ. नरेश पोटे, प्रा. भारती सहस्रबुद्धे, प्रा. रणजित देशमख, किशोर भुजबळ, डॉ. जयश्री कांबळे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, पुणे शहर रिपाई अध्यक्ष शैलेश चव्हाण, इत्यादी उपस्थित होते. सम्राट विचार मंच च्या वतीने संस्थापक अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, रामदास लोखंडे, आणि पुणेकर माझा चॅनेल च्या वतीने संपादक संतोष शिंदे यांनी आदरांजली वाहिली.