बोपोडी: एकीकडे भ्रूण हत्याचे प्रमाण वाढलेले असताना बोपोडीत मात्र एका नवं बालिकेचे आगमन अगदी वाजत गाजत मिरवणूक काढून फटाके वाजवीत नववर्षात घरी स्वागत करण्यात आले. बोपोडी भागातील पुणे मेट्रोचे पत्रकार मंगेश गायकवाड यांच्या घरी तिसऱ्या पिढी नंतर मुलीचे आगमन झाले. त्याचा आनंद व्यक्त करण्याकरिता चक्क आजोबा झालेले मंगेश गायकवाड यांनी एक आगळा संदेश देत मुलगी वाचावा हा प्रयोग प्रत्यक्ष रित्या आमलात आणला आणि जल्लोषात मुलीचे म्हणजे आपल्या नातीचे वाजत गाजत स्वागत केले. या समाज उपयोगी उपक्रमाला प्रत्यक्षात आमलात आणल्या बद्दल बोपोडीतील सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या सम्राट विचार मंच च्या वतीने जेष्ठ मार्गदर्शक बी एम कांबळे दादा यांच्या हस्ते मुलीच्या मातेचा आणि कुटुंबाचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मंचाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार दत्ता सूर्यवंशी, ओडीटर ऍड. विठ्ठल आरुडे, ऍड. योगराज पिल्ले, मातंग युवा आघाडीचे अध्यक्ष अंकुश साठे, संपादक संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भाऊ ओव्हाळ, राजेंद्र पालांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गायकवाड यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.