जळगाव साईनगर शिर्डी मडगाव गोवा रेल्वेसेवा कायमस्वरुपी सुरु करा-वैभव बहुतूले

दापोली-राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री वैभव बहुतूले यांनी जळगाव साईनगर शिर्डी ते मडगाव गोवा रेल्वेसेवा सुरु करण्यासंदर्भात मध्य रेल्वे महाप्रबंधक मुंबई व जळगाव खासदार उन्मेषदादा पाटील यांच्याकडे नुकतीच मागणी केली आहे.

कोकण प्रांतातुन खान्देश व खान्देश प्रांतातुन कोकणात शिक्षण,नोकरी,निम शासकीय,शासकीय सेवेत कार्यरत आहेत अ.नगर जिल्ह्य़ातील साईनगर शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान येथे दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक येत असतात कोकण रेल्वे मार्गावरून शिर्डी मडगाव रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने अशी रेल्वेसेवा सुरु करावी अशी मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनेकडे खान्देश,कोकण प्रांतातुन केली जात होती.

राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.शबनम शेख,कल्याण ते सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई अध्यक्ष सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर,राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत,कल्याण ते सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती ठाणे कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,साई पदयात्री मंडळ पेण व दापोली यांचे कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

जळगाव साईनगर शिर्डी मडगाव गोवा संबंधित प्रस्ताव प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वे संचार इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,रस्ते महामार्ग राजमार्ग सडक परिवहन दळणवळणमंत्री नितीन गडकरी,सांस्कृतिक पर्यटनमंत्री जी किसन रेड्डी,मा.अध्यक्ष रेल बोर्ड व उप निर्देशक कोचिंग यांच्याकडे प्रस्ताव मंजूरीकरिता पाठविण्यात आला आहे जळगाव साईनगर शिर्डी मडगाव गोवा ही रेल्वेसेवा सुरु झाल्यास त्याचा महाराष्ट्रातील प्रवाशांना लाभ होईल तसेच महाराष्ट्राचे आयात-निर्यात,पर्यटनवाढीला चालना मिळेल असे राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी सांगितले

× How can I help you?