कॅफे दुर्गा’च्या नवीन शाखेचे शुक्रवार पेठ येथे दिमाखात उद्घाटन,शैलेश पाटणे यांचे हॉटेल क्षेत्रात पाऊल

पुणे: पुण्यासह राज्यातील विविध शहरात खवय्यांच्या पसंतीचे कॅफे दुर्गा आता शुक्रवार पेठ पुणे येथील नवीन शाखेसह पुणेकर ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. आज रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी कॅफे दुर्गाचे दिमाकांत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या शाखेमध्ये ग्राहकांसाठी एसी आणि नॉनएसी दोन्ही प्रकारची उत्तम बैठक व्यवस्था शाखेचे प्रमुख शैलेश पाटणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दिली आहे.

उद्घाटन सोहळ्यासाठी नामांकित हॉटेल व्यावसायिक, कामत ग्रुप ऑफ हॉटेलचे मालक विठ्ठलजी कामत, आमदार सचिन अहिर,आमदार माधुरी मिसाळ यांच्या सोबत. माजी नगरसेविका मानसी देशपांडे,मनोज देशपांडे, शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.सदर शाखेचे प्रमुख शैलेश पाटणे यांनी हॉटेल क्षेत्रात पाऊल टाकले त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

× How can I help you?