पुणे– आम आदमी पार्टी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने समन्वयक गणेश ढमाले, अनिल धुमाळ, मनोज फुलावरे यांच्या नेतृत्वाखाली*
- सातत्याने वाढणाऱ्या गॅस किमतीला विरोध*
- १८% टोल दरवाढीला आमचा विरोध*
- ३७% वाढीला वीजदराला समर्थनाला विरोध*
- बेरोजगारी व भ्रष्टाचाराला विरोध*
महागाई विरोधात आप ची सह्यांची मोहीम चे आयोजन येरवडा इराणी मार्केट बस स्टॉप येथे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत महागाईला कंटाळलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला
यावेळी वडगावशेरी पदाधिकारी सुनीता शेरखाने, श्रद्धा शेट्टी, मिताली वडावराव, संजय कोने, मनोज शेट्टी, उत्तम वडावराव, तानाजी शेरखाने, शिवाजी डोलारे, जोगिंदर पालसिंग तुरा, अमित म्हस्के, उमेश शेट्टी, हर्षल भोसले यांनी सह्यांच्या मोहिमेचे प्रतिनिधित्व केले