खडकी :टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सात एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित “घर बंदूक बिर्याणी” या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक ,निर्माते नागराज मंजुळे,सायली पाटील आणि परश्या अर्थात आकाश ठोसर व सर्व टीम ला आमंत्रित करण्यात आले होते.महाविद्यालयाचे सचिव आनंद छाजेड यांच्या सुविद्य पत्नी सपना छाजेड यांच्या परिचय-सहकार्याने ही कलावंतांची टीम मोठ्या उत्साहाने महाविद्यालयात प्रोमो साठी आली होती.
मंजुळे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना चित्रपट क्षेत्रातील नवनवीन संधी विद्यार्थ्यांना सांगितल्या. यावेळी सपना छाजेड यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची दिलखुलास मुलाखत घेतली.
चित्रपट क्षेत्रातील तरुणांच्या मनातील गोड गुलाबी गुपितांचा वेध या मुलाखतीत होता.नागराज सर, तुम्हाला अमिताभ आवडतात की फॅन्ड्री ?.. शिवाय नागराज सर तुमची गाणी वेगळी कशी असतात? सर,तुमच्या गाण्यात असलेला अर्थ तरुणांना का भावतो?अशा विविध प्रश्नांची उत्तरे देताना नागराज आणि त्यांची पूर्ण कलावंत टीम ही विद्यार्थ्यांशी दिखुलास संवाद साधत होती. कार्यक्रम अतिशय मनोरंजक आणि तितकाच उत्साहवर्धक झाला. याप्रसंगी श्री.नागराज मंजुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की, विद्यार्थ्यांनो अभ्यास करा! चालच बिघडवायची हा त्यांचा आवडता संवाद विद्यार्थ्यांना खूप भावला. जाळ आणि धूर संघटच काढायचा यासाठी परीक्षा द्या, अभ्यास करा असेही त्यांनी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगितले.त्यांच्या मनोगतातील संदेश विद्यार्थ्यांना भावले. तरुणांचा आघाडीचा कालावंत आकाश ठोसर आणि सायली पाटील यांनी गुन गुन गुन… गाते मन हे.. या आगामी घर ,बंदूक बिर्याणी चित्रपटाच्या गीताचे शब्द विद्यार्थ्यांच्या समवेत गुणगुणले.विद्यार्थ्यांनी जल्लोषाने नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आणि अनेक त्यांच्या मराठी चित्रपटाच्या गीतांवर भर उन्हात बेधुंद नृत्य केले. महाविद्यालयीन तरुणाईचा जल्लोष पाहता सर्व भारावले होते. नागराज मंजुळे यांचा सन्मान खडकी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचे हस्ते करण्यात आला यावेळी सर्व कलावंतांचा सन्मान सर्वश्री संस्था पदाधिकारी – उपाध्यक्ष अनिल मेहता,सचिव आनंद छाजेड, मोहन जैन,सुरजभान आगरवाल,राजेंद्र भुतडा,कमलेश पंगुडवाले,सुधीर फेंगसे श्री काशिनाथ देवधर आणि सपना छाजेड पदाधिकारी यांनी केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.संजय चाकणे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकेत संजय चाकणे यांनी चित्रपट क्षेत्र आणि नुकतेच येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण यांचा समन्वय आपल्या मनोगतात साधला.नवीन शैक्षणिक धोरणात खुल्या शैक्षणिक पद्धतीत विद्यार्थ्यांनी अशा विविध उपक्रमांचा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानासाठी करून घ्यावा ही भूमिका त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्र संवादन प्रा. महादेव रोकडे डॉ.शितल रणधीर,आणि प्रा.नितीन पहिलवान यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार आनंद छाजेड यांनी मांनले
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक व संस्थेतील शिक्षक उपस्थित होते.