जिल्ह्यात अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावा या अनुषंगाने आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. तुळजापूर तालुक्यातून महामार्गाचे जाळे तयार होत असल्याने उद्योगधंद्यासाठी रोजगाराच्या सर्व प्रकारच्या संधी मिळणार आहेत. स्थानिकांना निश्चित रोजगार मिळेल.
शिक्षकांच्या माध्यमातूनच चांगली पिढी घडते. या अनुषंगाने शिक्षकांनी आपल्या सेवाकाळात सक्षम व समर्थ विद्यार्थी घडवावेत. तसेच जुन्या पेन्शन संदर्भात शासन सकारात्मक आहे. त्यानुसार सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक निश्चितच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी तहसीलदार सौदागर तांदळे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,गटविकास अधिकारी,प्रशांतसिंह मरोड,गट शिक्षणाधिकारी,मेहरुन्निसा इनामदार,माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, शिक्षकवृंद व नागरिक उपस्थित होते.