जाईश्वर शंभु महादेव मंदीर, जायफळ,ता.कळंब येथे अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा समाप्तीला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला

श्रीसंत लक्ष्मण महाराज,आष्टी येथील मठाधिपती विश्वचैतन्य शिवाचार्य यांच्या कीर्तनाचे श्रवण केले.
जाईश्वर महादेव मंदिरासमोर पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी आपण शासकीय २५१५ योजनेच्या माध्यमातून ५ लक्ष रुपये उपलब्ध करून दिले होते. सदर काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सभामंडप उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली. सदरील मागणी लक्षात घेऊन सभामंडप उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

Recent Post

× How can I help you?