धाराशिव-हेलिकॉप्टरद्वारे येडेश्वरी देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी सेवा यशस्वीरीत्या संपन्न झाल्याचे समाधान विशेष आहे

तुळजाभवानी देवीची धाकटी बहिण म्हणून नावलौकिक असलेल्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरु झाली. देवीच्या दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर देशभरातून लाखों भाविक येत असतात.देवीच्या यात्रे दरम्यान हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात यावी, अशी भाविकांची इच्छा होती, यासाठी खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली

चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रमासाठी लाखो भाविक रानात जमा झालेले असतात. देवीची पालखी पण सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान रानात निघत असते. हा योग साधून हेलिकॉप्टर मधून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीचे दृश्य पाहिल्यानंतर भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. हा आनंद सोहळा विशेष समाधान देणारा ठरला.

Recent Post

× How can I help you?