पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अभिजीत आपटे यांच्या मुद्रा मिशनला शुभेच्छा

पुणे: पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट जागतिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अभिजित आपटे यांनी घेतली.

यावेळी अभिजीत आपटे यांनी तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी सुरू केलेल्या मुद्रा मिशन ची माहिती दिली.
पंचायत राज आणि ग्रामविकास विभाग चे प्रदेश संयोजक गणेश काका जगताप सहसयोजक श्री गजानन जोशी यांचीही मोलाची साथ मिळणार असून पुरंदर आणि भोर वेल्हा तालुका उद्योजकता विकासासाठी आम्ही सर्वप्रथम निवडल्याची माहिती दिली. दादांनी मुद्रा मिशन च्या या कार्याला शुभेच्छा दिल्या.अभिजीत आपटे यांनी दादांना मोग-याचे रोप देऊन आभार प्रकट केले.या भेटीचे निमंत्रण महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदिप जी खर्डेकर यांनी दिले होते तरूणांना रोजगार निर्मिती कार्यक्रमात संदिपजींनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण भागाला आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या या कामात आशिष कुमार हे सहकारी असुन कॉर्पोरेट ॲग्रीकल्चर व्हिलेज तर्फे हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. यावेळी आरोही फाउंडेशनचे अध्यक्ष अधिकराव जगताप जागतिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश जोशी उद्योजीका जागृती कणेकर उपस्थित होते.
× How can I help you?