पुणे- पौड – दिघे पोर्ट महामार्ग क्रमांक 753 एफ या राजमार्गवर रस्ते अपघातामध्ये 100 पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन 2018 साली रस्ता रुंदीकरण आणि कॉक्रिटीकरणाचे सुरू झालेले काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. आणि 2018 पासून रस्त्याच्या कामाच्या ढिसाळ नियोजनामुळे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. एवढे होऊनही प्रशासन या रस्त्याच्या अर्धवट कामाची दाखल घेण्यास तयार नाही.
हे सगळे लक्षात आल्यावर लहुजी क्रांती दल ही सामाजिक संघटना या विषयामध्ये पुढाकार घेत असून स्थानिक लोकनेते, प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी वर्ग, औद्यागिक वसाहत संघटना, राजकीय नेते, स्थानिक लोक यांच्याशी विचार विनिमय करून आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. या संदर्भात
लहुजी क्रांती दल या सामाजिक संघटनेने आणि मुळशी संघर्ष समिती च्या वतीने पुणे मुळशी दिघे रस्त्या संदर्भातील सर्व प्रशासकीय कार्यालये व सरकारमधील संबंधित मंत्री यांना प्रत्यक्ष व पत्राद्वारे या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. प्रशासनाने या रस्त्याचे अर्धवट कामकाज लवकरात लवकर पूर्ण न केल्यास व होणाऱ्या अपघात कमी न झाल्यास प्रशासनास तीव्र आंदोलनाचा लहुजी क्रांती दल सामाजिक संघटनेने आंदोलनाचा
इशारा दिला.