मंडणगड:-नाशिक पुणे मार्गे मंडणगड एसटी बससेवा कायमस्वरुपी सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी प्रादेशिक महाव्यवस्थापक (वाहतूक) श्री शिवाजी जगताप यांच्याकडे केली आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हे महत्वाचे ठिकाण असुन लवकर विकसीत होणारा तालुका आहे मंडणगड,नाशिक व अन्य परिसरातील अनेक नागरिक शिक्षण,निम शासकीय व शासकीय नोकरी,व्यवसाय,उद्योग-धंद्यानिमित्त नाशिक,पुणे,मंचर,नारायणगाव,भोसरी,सिन्नर,आळेफाटा,
मंडणगड येथे कार्यरत आहेत मंडणगड येथील नागरिकांना नाशिक,सिन्नर,आळेफाटा,नारायणगाव,मंचर,भोसरी,पुणे येथे जाण्यासाठी पुरेशी बससेवा नसल्याने येथे जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे