तेर येथे जयंतीचे औचित्य साधून भीमनगर, साठेनगर येथे विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.*
निळा झेंडा चौक, भीमनगर येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून रु.१० लाखाचे सभागृह भूमिपूजन,तसेच शासनाच्या विविध योजनांतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक भवन बांधणे रु.२० लाख,मातंग समाजातील स्मशानभुमित जाण्यासाठीचा सिमेंट रस्ता रु.०५ लाख, स्मशानभूमी संरक्षण भिंत रु.०६ लाख,दहन शेड रु.०५ लाख आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी तेर येथील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.