डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चे वाटप

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट नवी खडकी येरवडा पुणे यांच्या वतीने मंडळाचे युवा कार्यकर्ते कै.संदीप अडागळे उर्फ पप्पू यांचे स्मरणार्थ आदिवासी डोंगरी विभाग अंतर्गत श्री. पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पोखरी,भीमाशंकर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रशस्तिपत्रक देऊन प्रोत्साहित करण्यात आले.तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना महापुरुषां वरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले..

सदर कार्यक्रमास जय गणेश व्यासपीठ वरील मंडळाच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. पियुष शहा,ऍड.अविनाश साळवे, ऍड.अलिशा साळवे,अभिषेक मारणे,डॅनियल लांडगे,लक्ष्मण काते राकेश चव्हाण ह्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारत कांबळे व आभार प्रदर्शन अमित जाधव ह्यांनी केले

कार्यक्रमाचे आयोजन अमित जाधव, अक्षय रजपुत, शुभम पोळ, विकास धोत्रे, नितीन माने व सर्व कार्यकर्त्यांनी केले होते. बाबासाहेबांच्या जयघोष करीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला…

× How can I help you?