पुणे बार असोसिएशन च्या वतीने डिफेन्स इन मोक्का ऍक्ट या विषयावरती प्रमुख वक्ते अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे स्पेशल मोक्का कोर्ट मा.सत्यनारायण नावंदर साहेबांचे व्याख्यान आज शिवाजीनगर कोर्ट मधील अशोका हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते.
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे मा. श्री श्याम छ. चांडक साहेब यांच्या प्रमुख उपस्थित दिप प्रज्वलन करून व्याख्यानमालेचे उदघाट्न करण्यात आले. या वेळी दोन्ही मान्यवरांचा स्मुर्तिचिन्ह आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास पुणे बार असोसिएशन चे उपाध्यक्ष ऍड. विश्वजित पाटील, ऍड. जयश्री चौधरी बिडकर, ऍड. गंधर्व कवडे खजिनदार, ऍड. समीर बेलदरे हिशेबतपासणीस, ऍड. अजय देवकर तसेच कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
या वेळी पुणे जिल्हा ग्रंथालयाला क्रिमिनल लॉ जनरल पुस्तके प्रदान करण्यात आली तसेच ऍड. विद्याधर कोशे स्मरणार्थ पुणे नवीन बार रम ला थंड पाण्याचा कुलर देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ विधिज्ञ कै. ऍड. विद्याधर कोशे यांचे ज्युनियर व सहकारी वकील मित्र परिवार ऍड. चेतन भुतडा, ऍड. विठ्ठल आरुडे, ऍड. हेमंत भांड, ऍड. चंद्रशेखर जाधव, ऍड. तुषार चव्हाण, ऍड. महेंद्र दलालकर, ऍड. उर्मिला जाधव, ऍड. वनमाला अनुसे, ऍड. महेश तुपे, ऍड. सचिन चौगुले, ऍड विनोद शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ऍड. राहुल कदम आणि आभार ऍड. मनोज बिडकर यांनी मानले.