आमदार उमा ताई खापरे यांच्या हस्ते कोळथरे गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न!

भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांचा आज कोळथरे ता.दापोली येथे दौरा संपन्न झाला.
कोळथरे गावातील कुंभारवाडी , आडविलकर वाडी आणि वरची भंडारवाडी भागातील वर्दळीचे असणारे मुख्य रस्ते अनेक वर्ष प्रलंबित होते, या ३ रस्त्याना मा.आमदार उमाताई खापरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रु.३०लाख मंजूर करुन, वर्क आर्डर्स झाल्या आणि आज त्या कामाचे भूमीपूजन देखील संपन्न झाले.

कोळथरे पंचंनदी चिखलगाव आणि देवके या भागात मिहीर महाजन यांनी विशेष पाठपुरावा करुन विविध योजना मध्ये विकासकामांचा सामावेश करून घेतला आहे. एकाच वर्षात मा.उमाताई खापरे यांच्या शिफारशीने एकूण रु.१ करोड च्या निधीची विकासकामे या जिल्हा परिषद गटात शासनाकडून मंजूर करून आणल्याचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने घोषित करण्यात आले.

गावात आणि पंचक्रोशीत विकास कामांचा झरा आल्याने भाजपा कार्यकत्यांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. आज कोळथरे गावात बसस्थानक आणि वरचा भंडारवाडा येथे २ भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पडले. या दौऱ्याचा समारोप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाजन यांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने कोळथरे उपसरपंच अंतरा झगडे, सदस्य शैलेश सांकुळकर, ज्योती महाजन, अंजनी संकुलकर, पंचनदी उपसरपंच अमित नाचरे, सदस्य सुदर्शन जाधव, उसगाव सदस्य गायत्री वैद्य या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधीसह भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नीलम ताई गोंधळी, प्रदेश सचिव ऍड. वर्षा डहाळे, स्मिता जावकर, दीपक महाजन, तालुका सरचिटणीस लहू साळुंखे, प्रसाद मांडवकर, बुथ अध्यक्ष प्रवीण तोडणकर, विद्याधर जोशी, राजन झगडे, प्रतीक जाधव, सुनील सोमण, कृष्णचंद्र पेटकर आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार उमाताई खापरे यांनी सांगितले की मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासाची गंगा कोकणात प्रवाहित करण्यासाठी आगामी सर्व निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा विजय अत्यंत महत्वाचा ठरेल आणि त्यासाठी भाजपा कार्यकर्ते कटिबद्ध आहेत.

× How can I help you?