विजयकुमार शेटे यांना “आंबेगाव भूषण 2023″पुरस्कार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरेवाडी येथील विजयकुमार शेटे यांना आंबेगाव तालुक्यातील “आंबेगाव भूषण 2023” या पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली आहे. हा पुरस्कार युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षण,कला, उद्योग, क्रीडा, वैद्यकीय, पत्रकारिता, आरोग्य, आदर्श सरपंच, सहकार, विधीतज्ञ,महिला बचत गट, समाजरत्न व समाजभूषण अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या 44 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंती महोत्सव निमित्ताने हा पुरस्कार देण्यात येणार आहे