मानवता टिकवण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी सर्वानी एकत्रित यावे.

बोपोडी : समाजात आज जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती नाहीशी करण्याकरिता आपल्या थोर समाजसुधारकांनी आपल्याला जी शिकवण समस्त मानव जाती च्या कल्याण करिता दिली आहे त्याचा सदुपयोग करण्याची वेळ आली आहे त्या साठी सर्वांनी एकत्रित येऊन मानवता टिकवली पाहिजे अशा शब्दात सर्वच धर्म गुरूंनी आपले मत व्यक्त केले. रमझान ईद निम्मित राष्ट्रीय एकात्मता आणि बंधू भाव बंधू  कायम रहावा या उद्देशाने सर्व धर्मीय ईद मिलनाचा कार्यक्रम बोपोडी भाजी मंडई येथे जमातुल मुस्लेमिन बोपोडी पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सर्व धर्म गुरूंनी आपली भूमिका मांडीत शुभेच्छा दिल्या. संविधानामुळे आपला देश एक संघ आहे म्हणून या वेळी ह.भ.प सचिन निकम, गुरुद्वारा ग्रंथी प्रमुख ग्यानी मुखत्यार सिंगजी, मुस्लिम धर्मगुरू  मौलाना अब्दुल रशीद मिफ्ताही यांना संविधान उद्देशिका फ्रेम गोदाई फाउंडेशन अध्यक्ष विनोद रणपिसे आणि मा. नगरसेवक मनीषजी आनंद यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमासाठी पुण्याच्या उपमहापौर सुनीताताई वाडेकर,खडकी पोलीस स्टेशन पी आय ताम्हणे साहेब, क्राईम पी आय पाटील साहेब, अनिल पवार साहेब, मा.नगरसेवक श्रीकांतजी पाटील, मा. नगरसेवक ऍड.नंदलाल धीवार,लिंगायत समाजाचे प्रतिनिधी बसवराज,ऍड.रमेश पवळे,ऍड.विठ्ठल आरुडे, मैनुउद्दीन अत्तार,विशाल जाधव,मुसलेताई,अर्चनाताईं कांबळे,ज्योतीताई परदेशी,सुंदर ओव्हाळ,वसुधाताई नीरभवने,प्राजक्ता गायकवाड,इकबालभाई शेख,इसार कुरेशी,अंजुम इनामदार,महंमद शेख, साजिद शेख,अमित मुरकुटे, राजेंद्र भुतडा, अनिल भिसे,फिरोज मुल्ला,मोहन मस्के, जीवन घोंगडे,सुरेश पवार,के.पी.घागट, मिलिंद माने इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुबेर पिरजादे, सूत्रसंचालन सादिकभाई शेख आणि आभार डॉ. निसार खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुनाफ शेख, सलीम बेपारी, बाबाजान शेख, फारुख पिरजादे, शहाबुद्दीन काजी, बाबाजान सौदागर, रियाझ इनामदार, करीम शेख, नौशाद सौदागर, सादिक शेख, मुजीफ बुखारी, आयुब शेख, अबुल वाजिद, सिद्दिक पठाण, करीम तुर्क, अहमद मणियार इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
× How can I help you?