बोपोडी : समाजात आज जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती नाहीशी करण्याकरिता आपल्या थोर समाजसुधारकांनी आपल्याला जी शिकवण समस्त मानव जाती च्या कल्याण करिता दिली आहे त्याचा सदुपयोग करण्याची वेळ आली आहे त्या साठी सर्वांनी एकत्रित येऊन मानवता टिकवली पाहिजे अशा शब्दात सर्वच धर्म गुरूंनी आपले मत व्यक्त केले.
रमझान ईद निम्मित राष्ट्रीय एकात्मता आणि बंधू भाव बंधू कायम रहावा या उद्देशाने सर्व धर्मीय ईद मिलनाचा कार्यक्रम बोपोडी भाजी मंडई येथे जमातुल मुस्लमिन बोपोडी पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सर्व धर्म गुरूंनी आपली भूमिका मांडीत शुभेच्छा दिल्या.