बोपोडी : तथागत गौतम बुद्ध यांची 2567 वि जयंती मराठवाडा मिलिंद संघ बोपोडी येथील मिलिंद विहारात मोठ्या उल्हासात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली. धार्मिक वंदना, धम्म पठण घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उमेश गायकवाड , महिला अध्यक्षा चारुशीला भालेराव यांच्या उपस्थित वैशाख पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तथागत गौतम बुद्ध जयंती निम्मित जेष्ठ मार्गदर्शक डी बी कांबळे, बौद्धाचार्य लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण सोनके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.