संतोष शिंदे संपादक पुणेकर माझा,सामाजिक कार्यकर्ते यांचा बोपोडीकरांच्या वतीने सन्मान.

पुणे : बोपोडी सम्राट विचार मंच च्या वतीने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल पुणेकर माझा चॅनेलचे संपादक संतोषजी शिंदे यांच्या वाढदिवसा निम्मित बोपोडी सिग्नल चौकात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

आणि शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी काँग्रेस जेष्ठ नेते छोटू  पिल्ले, धम्मक्रांती महोत्साव समिती
अध्यक्ष इंद्रजित भालेराव, महिला अध्यक्षा कांताताई ढोणे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस विजय जाधव, यांनी शिंदे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

काँग्रेस चे पुणे शहर सर चिटणीस विनोदभाऊ रणपीसे यांनी शिंदे यांना धम्म पुस्तके देऊन सन्मान केला. अख्तरी शेख, काँग्रेसचे जेष्ठ नेते मैनुउद्दीन अत्तार, मातंग आघाडी बोपोडी अध्यक्ष अंकुश साठे, रमाई फाउंडेशन अध्यक्ष जेष्ठ मार्गदर्शक भीमराव सोनवणे, सम्राटचे ऍड. विठ्ठल आरुडे, रिपब्लिकन स्वाभिमानी पुणे शहर अध्यक्ष जीवन घोंगडे, एकता मानव सेवा अध्यक्ष सादिकभाई शेख, काँग्रेस प्रवक्ते करीम तुर्क, सामाजिक कार्यकर्ते बी एम कांबळे,शशी ओव्हाळ, मिलिंद माने, सिद्दीकी पठाण इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले.
× How can I help you?