पुणे (प्रतिनिधी) : उन्हाळी सुटीचे निमित्त साधत अभिव्यक्ती, संघटीत महिला मंडळ, ताडीवाला रोड आणि जवाहर बाल मंच, पुणे शाखा यांच्यातर्फे वस्तीतील मुला-मुलींसाठी एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. शनिवार, ६ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबीरात वस्तीतील जवळपास ५० मुला-मुलींनी भाग घेतला होता. विज्ञान प्रयोग, ओरिगामी हस्तकला, सामूहिक शरीरशिल्प बनवणे पासून ते गाणी, विज्ञान कोडी व मजेदार खेळ इथपर्यंत विवध उपक्रमात मुलांनी भाग घेतला.