राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कॉफी विथ एम एल ए (coffee with MLA) सुनिलआण्णा टिंगरे या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं

कार्यक्रमांमध्ये वडगाव शेरी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनिल आण्णा टिंगरे यांच्यासोबत बसून विविध मुद्द्यांवर गोष्टीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. कॉफीचा आस्वाद घेत विविध मुद्द्यांवर, मनमोकळेपणाने असंख्य तरुणांनी संवाद साधला

तरुणांच्या प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करून त्यावर चांगल्या qप्रकारचा प्रतिसाद दिला. येणाऱ्या नवीन पिढीला सन्माननीय आमदार साहेबांनी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी ही प्रत्येक नवयुवक तरुणाला समजावी, यासाठी संघटनात्मक बांधणी कशाप्रकारे केली जाते याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मतदार संघातील महाविद्यालयीन तरुण तरुणी मोठया संख्येने उपस्थित राहिले. या सर्वांचे स्वागत आमदार साहेबांनी केले. उपक्रमाला युवकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अशा कार्यक्रमांचे नियोजन व्हावे अशी युवकांमार्फत मागणी करण्यात आली

Recent Post

× How can I help you?