गणेश शेरला यांच्या वतीने गुलटेकडी मीनाताई ठाकरे,औधोगिक वसाहत, येथे आरोग्य शिबीर संपन्न

गुलटेकडी महर्षिनगर भागातील नागरीकांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहण्यासाठी इंदिरानगर गुलटेकडी वसाहत भागातील सर्वांनसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते.

गुलटेकडी येथे एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात 150 हुन अधिक जेष्ठ नागरीक,महीला ,पुरूष व मुले यांनी लाभ घेतला.निरोगी राहण्यासाठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन व औषध उपचार करण्यात आले.
यावेळी शिबीराला भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट दिली प्रभाग अध्यक्ष राजेंद्र सरदेशपांडे,गणेश शिवशरण,रवि जाधव,रविद्र मोरे,रोहन गायकवाड,राहुल राजभर,नजीर शेख,सोमनाथ तळेकर, मारूती कांबळे,महेश सांळुखे यांनी वस्तीतील शिबीरास आवर्जुन भेट दिले.आजच्या आरोग्य शिबीरास सहकार्य एकता सेवा प्रतिष्ठाण यांनी केले.

Recent Post

× How can I help you?