पुण्यात रिक्षा चालकाला जातीयवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्या प्रकरणी अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

खराडी येथे रिक्षा चालक फिर्यादी अक्षय चंदनशिवे रा. येरवडा यांना आरोपी ज्ञानेश्वर पठारे रा. खराडी याने लाथा बुक्याने तसेच उसाच्या काठीने मारहाण करीत जातीय वाचक शिवीगाळ केली होती, फिर्यादी चंदनशिवे है खराडी चौकातून गाडी वळवत असताना समोरून चारचाकी मधून येणाऱ्या आरोपी पठारे व त्याच्या साथी दारांनी फिर्यादी च्या रिक्षा समोर चारचाकी आडवी घालून हुज्जत घालण्यास सुरुवात केली व फिर्यादी च्या रिक्षा वर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावं असल्याने आरोपीने फिर्यादीस जातीयवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली,

वरील घटनेची चंदन नगर पोलीस स्टेशन प्रशासन ने दखल घेतली असुन आरोपी पठारे विरोधात गुन्हा दाखल केला आहे, व आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहराच्या वतीने देण्यात आला आहे.
× How can I help you?