प्रसिध्द उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराचे वितरण.

पुणे : दत्ता सूर्यवंशी. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना सातत्याने प्रेरित करून सामाजिक बांधिलकी जपत आपुलकीच्या नात्याने रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारीकेंचा प्रसिध्द उद्योजक आणि समितीचे आधारस्तंभ कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते फ्लोरेंस नाईटिंगल पुरस्काराचे वितरण आज पुण्यात करण्यात आले.

गेली तीस वर्ष सामाजिक बांधिलकी जपत समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुणे शहर रुग्ण सेवा समिती च्या वतीने यंदाचा फ़्लोरेंस नाई टिंगेल पुरस्कार ससून रुग्णालयातील परिचारिका करुणा विजय सोनवणे यांना कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते स्मुर्तिचिन्ह,शाल,आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला
तसेच राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा येथील अर्चना रायचंद दाते, सविता ढोले, औंध रुग्णालयाच्या जयश्री सांगळे, मीनाक्षी चव्हाण आणि शिल्पा घोडके यांचा हि यावेळी स्मुर्तिचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा, प्रशांत टेके,विजय जाधव,अनिल भिसे, विशाल जाधव समितीचे सदस्य फोटोग्राफर विजय सोनिग्रा, दत्ता सूर्यवंशी, राजेश माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजित भालेराव, आणि आभार विजय जाधव यांनी मानले.
× How can I help you?