जागतिक परिचारिका दिनानिमित्त
पुणे शहर रुग्ण सेवा समितीचा फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार ससून मधील करुणा सोनवणे यांना प्रधान

12 मे हा जागतिक पारिकारिका दिन जगभरात ज्यांच्या जन्मदिवस मनून साजरा केला जातो.त्यांच्या नावाचा पुरस्कार यावेळी जेष्ठ उद्योजक माननीय कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते ससून येथील पारिचारिका करुणा सोनवणे यांना यावेळी देण्यात आला. ज्यावेळी अन्य पाच पारिचारिका यांचा विशेष सन्मान करण्यात आला यामध्ये राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथील अर्चना दाते व सविता ढोले औंध कोठी रुग्णालयातील जयश्री सांगळे तसेच शिल्पा घोडके या पारिचारीकांना त्यांनी त्यांच्या सेवेत केलेल्या महत्त्वपूर्ण कामाबद्दल देण्यात आला.

या कार्यक्रमाला पुणे शहर रुग्ण सेवा समितीचे अध्यक्ष माननीय राजेंद्र भुतडा उपाध्यक्ष इंद्रजीत भालेराव विशाल जाधव ,चिटणीस प्रशांत टेके विजय जाधव अनिल भिसे तसेच विजय सोनिग्रा ,दत्तात्रय सुर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना, कृष्णकुमार गोयल म्हणाले गेली 25 वर्षापासून मी या रुग्णसेवा समिती सोबत काम करत आहे. सेवा समितीचे काम हे रुग्णांना येणाऱ्या अडचणी व पारिचारिका डॉक्टर यांचा मधील समन्वयाचे काम आहे. परिचारिकांनी कोविड काळात केलेल्या कामात त्यांची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. पारिचारीक यांचा सन्मान करून एक प्रकारे आपण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करणे हा एकमेव उद्देश आहे. सदर पुरस्कार हा आपण पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या व कार्यरत असणाऱ्या पारिचारिकांना देत असतो .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजीत भालेराव यांनी केले प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा यांनी केले आभाराचे काम विजय जाधव यांनी केले
× How can I help you?