आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील आळंदी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादितच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकी नंतर झालेल्या अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षपदी दिलीप मुंगसे, उपाध्यक्षपदी अरुणा घुंडरे यांची बिनविरोध निवड झाली. अशी माहिती सोसायटीचे सचिव सचिन कुऱ्हाडे यांनी दिली. .
अध्यक्षपदी दिलीप मुंगसे तसेच उपाध्यक्ष पदी अरुणा घुंडरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सोसायटी संचालक, आळंदी, केळगावचे पदाधिकारी उपस्थित ग्रामस्थांचे वतीने सत्कार झाला.