बुद्धभूषण समाज मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

बोपोडी : दत्ता सूर्यवंशी. बोपोडीतील ऐतिहासिक ओळख असलेल्या बुद्धभूषण समाज मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निम्मित बोपोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाराष्ट्रा चे लोकप्रिय गायक राघू  फेम राहुलजी शिंदे यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आणि चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी युवा नेतृत्व शशिकांत भालेराव प्रमुख उपस्थिती आमदार सिद्धार्थजी शिरोळे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, पी एस आय अनिल उसूलकर, पी एस आय राजू देवकर गायक राहुल शिंदे,विनोद रणपीसे, इंद्रजित भालेराव, विजय जाधव, महेंद्र कांबळे, सुभाष गजरमल, सिध्दार्थ बाराथे, बंटी माने, विनोद सोनवणे, गणेश शिंदे, जुबेर पिरजादे, जीवन घोंगडे, पत्रकार दत्ता सूर्यवंशी, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमाली गजरमल, अश्विनीताई गायकवाड , सुंदर ओव्हाळ, नंदाताई निकाळजे इत्यादी उपस्थित होते.
या वेळी आमदार शिरोळे म्हणाले आपल्याला संत महापुरुषांचा विचारांचा वारसा लाभला आहे. त्यांचे विचार युवा पिढीला निश्चित मार्गदर्शक ठरतील त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून युवा पिढीला हा महापुरुषांचा विचाराचा वारसा समजावून सांगितला पाहीजे. या वेळी लोकप्रिय गायक राहुलजी शिंदे यांचे सुपुत्र रोहित शिंदे यांनी आपल्या वडिलांचा वारसा संभाळत गायकी ला सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष गजरमल सूत्रसंचालन अशोक गायकवाड सर आणि आभार विनोद यादव यांनी मानले.
× How can I help you?