आळंदी परिसरात छत्रपती शंभूराजें यांची जयंती साजरी

आळंदी ( मल्हार भाऊकाळे) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव आळंदी परिसरात आनंदाने साजरा करण्यात आला. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहराच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी प्रतिमा आणि मूर्तीची पूजा करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी मनसे आळंदी शहराध्यक्ष अजय तापकीर, विनोद कांबळे, सागर बुर्डे, मिथिल पाटील, मोहन शिंदे, ज्ञानेश्वर वाढेकर, कैलास मुळे, अभिजित तांबे, प्रवीण खलटकर यांचेसह शहरातील मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मातृदिनाचे आयोजन देखील कारण्यातआले
× How can I help you?