३७ दिव्यांगांची दक्षिण भारतात भटकंती
शिवुर्जा प्रतिष्ठान संस्थेचा अनोख उपक्रम

पैठण प्रतिनिधी
राज्यातील दिव्यांगांसाठी दक्षिण भारतातील कन्याकुमारी, रामेश्वरम व मदुराई या ऐतिहासिक ,धार्मिक व सागरी ठिकाणाची भटकंती मोहीम शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत करण्यात आली होती. शिवुर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील अंध अपंगांची दुर्ग भ्रमण संवर्धन संस्था असून गेल्या पंधरा वर्षापासून संस्थेमार्फत राज्यभरात भटकंती व अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमताच महाराष्ट्राच्या बाहेर अर्थात दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात दिव्यांगांसाठी भटकंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक ११ मे ते दिनांक १८ मे दरम्यान आयोजित या भटकंती मोहिमेत राज्यातील पुणे ,नाशिक, बीड ,अकोला ,छत्रपती संभाजीनगर ,अहमदनगर ,सोलापूर ,सांगली, नागपूर ,मुंबई या जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ३७ दिव्यांगांनी व त्यांच्या मदतनिसांनी सहभाग घेतला होता. या ३७ सहभागी सदस्यांपैकी २२ पुरुष व १५ महिला मुलींनी सहभाग घेतला होता तर अनेक दिव्यांग हे कुबडी व काठीच्या सहाय्याने सहभागी झालेले दिसून आले. कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक, हिंद महासागर अरबी समुद्र व बंगालच्या खाडीचा त्रिवेणी संगम, रामेश्वरम येथील रामेश्वरम ज्योतिर्लिंग धनुष्य कोडी रामसेतू तर मदुराई येथील मीनाक्षी मंदिराला या दिव्यांगांनी भेटी दिल्या. संस्थेचे सचिव कचरू चांभारे यांनी या मोहिमेस उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.


शिवाजी गाडे, कचरू चांभारे, अंजली प्रधान, सुनील पवार, गुलाब महाले, सतिष अळकुटे, कल्याण घोलप, सुवर्णा गजभिये, काजल कांबळे, प्रियंका देशभ्रतार, शबाना पखाली, रघुनाथ सातव, सुनील वानखेडे, अर्जुन शिरोळे ,विवेक गुंड ,संतोष पालवे, चेतन रत्नपारखी, विक्रांत उपासनी, ओम तारू ,दत्तात्रय साळी, अश्विनी चांभारे ,कविता पवार ,वैशाली भालेकर, शिवराम पवार ,एकनाथ भालेकर, संतोष बटुळे ,निकिता बटुळे, दीपक गायकवाड, अश्विनी तारू ,अर्चना ढिले, खुशी गाडे ,शांताबाई प्रधान, बाळकृष्ण पवार ,चंद्रगुप्त रोकडे, प्रतिभा रत्नपारखी, चेतना उपासनी यांनी मोहिमेत सहभाग घेतला आणि सहकार्य केले
× How can I help you?