येरवडा भागात गुन्हेगारीने हौदोस घातला मारामाऱ्या दरोडे खुन वेगवेगळ्या आमली पदार्थाची विक्री ह्यांसारख्या प्रकाराने जनता त्रस्त झाली आहे जनतेच्या कायम मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे साध शहरातुन येरवड्यात यायच तर रिक्षा येत नाही, बर्गर पिझ्झा सारख्या विक्री करणारे येरवड्यात येत नाही,बॅकेत कर्ज मिळत नाही मुला मुलीचे लग्नासाठी स्थळ मिळत नाही ह्या सर्व भयानक समस्याना येरवडा भागातील जनतेला तोड द्यावे लागत आहे त्यामुळे जनता प्रचंड मानसिक तनावाखाली वागत आहे बहुसंख्य लोक मिळेल त्या भावाला आपली घरे विकुन दुसऱ्या ठिकाणी रहायला जात आहे स्थलांतर करीत आहे कारण येथे रहायच म्हणल तर कोणत्या तरी भाईला हाप्ता देऊन किंवा त्याच मांडलिकत्व स्वीकारून तो देईल तशी वागणुक सहन करावी लागत आहे