शिवगर्जना मित्र मंडळाकडून वनदेवी टेकडी वर स्वछता अभियान,शिक्षकांचा सत्कार, वह्या वाटप,भजनी मंडळीच्या कार्यक्रमाचे आयोजन*

*कर्वेनगर चा भाऊसाहेब रंगारी शिवगर्जना मित्र मंडळातर्फे वनदेवी टेकडी कर्वेनगर स्वच्छता *अभियानआयोजित करण्यात आले
पहिल्यांदाच केले आहे आपण
नैसर्गिक संपत्तीचे लोकांकडून विघटन होत आहे तसेच आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराची निसर्गाची जबाबदारी आपल्यावर असते. आशा त्या नैसर्गिक टेकडी वर मद्यपान करून कचरा टाकून टेकडीचे रूपांतर कचराकुंडी मध्ये होताना दिसत आहे म्हणून शिवगर्जना मित्र मंडळातर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आले

शिक्षक दिनानिमित्त शिवगर्जना मित्र मंडळ, कर्वेनगर यांच्या कडून कर्वेनगर व कोथरूड भागातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांना छोटीशी भेटवस्तू आणि रोप देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच वृक्षारोपणाचा संदेश सुद्धा देण्यात आला
शिक्षण हे समाज सुधारण्यासाठी प्रभावी माध्यम आहे ..
त्यास प्रोत्साहन देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न
१ली ते १०वि च्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ शांतीबन यांनी त्यांच्या सुरमय भजनाने वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले.यावेळी
अध्यक्ष सुरज मोहिते, उपाध्यक्ष माही दळवी,कार्याध्यक्ष बालाजी पवार,उपकार्याध्यक्ष अभिजीत मोरे,शिवाजी कडू ,कल्याणी हा, लहू वांजळे ,दिलीप वाकडे,सर्व पदाधिकारी मंडळाचे हितचिंतक उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला*

Recent Post

× How can I help you?