ज्वेल्स ऑफ आलेगावकर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

खडकी : दत्ता सूर्यवंशी-
शालेय जीवनाचा 40 वर्षा पूर्वीचा वर्ग शिक्षकांच्या समवेत पुन्हा एकदा टीकाराम जगन्नाथ हॉल मध्ये रविवारी एक दिवसा साठी तुडुंब भरला होता. अवचित्य होते ज्वेल्स ऑफ आलेगावकर माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा. या स्नेह मेळाव्यात माझी विध्यार्थ्यांच्या वतीने आज रोजी शाळेत शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप करून एक मदतीचा हात देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पोपट आल्हाट प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव आनंद छाजेड, लायन्स क्लब च्या अध्यक्षा सपना छाजेड, संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र भुतडा, प्रशांत टेके, अध्यक्ष राकेश सहाय, आसावरी अंतुरकर, अत्रे मॅडम, छत्रे, शिंत्रे, देशपांडे, जैन सर, मुख्याध्यापक लोणकर, टिळेकर, पाटोळे सर, प्रा. अरुण शेलार, पी एस आय अशोक खंडाळे, पत्रकार दत्ता सूर्यवंशी, सुरज हंसपाल, प्रवीण निंबाळकर, विजय दळवी, कुमार बहिरट, इत्यादी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज चाळीस वर्षा पूर्वी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करणारे माझी विद्यार्थी आपल्या शाळेला आणि शिक्षकांना न विसरता आपल्याच विध्यार्थ्यांना मदतीचा हात देतात हा त्यांचा मोठेपणा आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने मी आभार मानतो.
या वेळी शाळेतील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि कब्बड्डी पट्टू कर्मचारी तुकाराम यांचा माजी विध्यार्थ्यांच्या वतीने संपूर्ण पोशाख देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर भोगावडे, सूत्रसंचालन प्रा. प्रवीण रोकडे आणि आभार विकास जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय धापटे, राजेश लोणारे,राजू धापटे,कुमार बहिरट, सुरेंद्र हरीप, शाम उत्तेकर, इमॅन्युल सोरटे, प्रमोद महामुनी, सतीश महाजन, आनंद कुबेर, महेंद्र चव्हाण, विनय पटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
× How can I help you?