आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : आषाढी वारी साठी केलेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आळंदी मंदिरासह इंद्रायणी नदी वरील भक्ती सोपान पूल मार्गे दर्शनबारी परिसराची पाहणी केली. ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पाहणी केली. येथे माहिती जाणून घेत संवाद साधला. यावेळी माऊलीं मंदिरात विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला.