आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील श्री साई हॉस्पिटलच्या २२ वा वर्धापनदिन व अंकुर आयुर्वेद व फर्टिलिटी सेंटरचे उदघाटना निमित्त मोफत स्त्रीरोग तपासणी आरोग्य शिबीर उत्साहात आयोजित करण्यात आले. या शिबिरात सर्व वयोगटातील ५२ महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली. २० महिलांची रक्त तपासणी करण्यात आल्याचे संयोजक डॉ. ज्योती माटे यांनी सांगितले.
या क्षेत्रातील २६ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल असे त्यांनी सांगितले. शिबिरासाठी डॉ उत्तम माटे, कमलेश खैरनार यांचेसह साई हॉस्पिटल चा स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.