आळंदीत श्रींचे समाधीवर श्री विष्णू अवतार

आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील गोपाळपुरातील वैभव श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ येथे श्रींचे क्षेत्रोपाध्ये पुजारी गांधी परिवाराने परिश्रम पूर्वक श्रींचे संजीवन समाधीवर श्री विष्णू अवतार चंदन युतीचा वापर करून साकारला. लक्षवेधी वस्त्रालंकार यामुळे श्रींचे रूप लक्षवेधी होते. नित्य नेमाने येणाऱ्या भाविकांनी श्रींचे लक्षवेधी रूप आपल्या नेत्रांत साठवून श्रींचे दर्शनास गर्दी केली. गोपाळपुरात श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ असून येथे आळंदीतील श्रींचे पुजारी गांधी परिवार सेवारत आहे. आळंदीचे माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी, नितीन गांधी आणि गांधी परिवार नेहमी लक्षवेधी चंदन उटी साकारत आपली सेवा रुजू करीत असल्याचे भीमाजी घुंडरे पाटील यांनी सांगितले.

पूर्वी आळंदी मंदिर आणि आणि स्वामी महाराज मंदिर येथे चंदन उटीची परंपरा सुरु होती. अलीकडे येथील श्री गोरोबा काका मंदिरातही सेवक आणि भक्तांचे वतीने बल्लाळेश्वर वाघमारे यांनी सेवा सुरु केली आहे.
× How can I help you?