पुणे शहर -प्रतिनिधी – जब्बार मुलाणी-हडपसर पोलीस स्टेशन हे पुणे शहर आयुक्तालयातील सर्वात व्यस्त असे पोलीस स्टेशन असुन पोलीस स्टेशनमध्ये कामाची व्याप्ती पाहता शिवजयंती, गणेशोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, पालखी बंदोबस्त इतर सण उत्सवा दरम्यान वेगवेगळया संघटना, मंडळे, तसेच मोहल्ला कमिटी, शांतता कमिटीच्या मिटींग घ्यावा लागतात. पुणे शहरात सर्वाधिक अधिकारी व स्टाफ असलेल्या हडपसर पोलीस स्टेशन मध्ये या सर्वांच्या मिटींगसाठी एक सभागृह असणे अत्यंत आवश्यक होते. या सभागृहाची निर्मीतीसाठी गिट्स कंपनी प्रा लिव बी एन वाय प्रा लि या कंपन्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
दिनांक ०९/०६/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता हडपसर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या १२५ आसन क्षमतेच्या सभागृहाचा उद्घाटन सोहळा मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन पुणे शहर पोलीस दलाचे मा.. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मा रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ५, पुणे शहर मा विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर मा अश्विनी राख सो हे उपस्थित होते. तसेच हडसपर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा अरविंद गोकुळे, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक मा विश्वास डगळे तसेच हडपसर पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी व अंमलदार कार्यक्रमास उपस्थित होते.