दिव्य समाज निर्माण संस्थेच्या वतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

राजेगाव / भिगवन : १० जून २०२३ :दिव्य समाज निर्माण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, शांलात परीक्षेमध्ये चांगले यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हार्मोनी ऑर्गानिक प्रा.लि .कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट सुनिल आडेफ सर यांच्या उपस्थित प्रशास्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला .

या वेळी सुनिल आडेफ सर व डॉ.जयप्रकाश खरड यांनी विद्यार्थ्यांना करियर संदर्भात मार्गदर्शन केले. दिव्य समाज निर्माण संस्थेचे अध्यक्ष रमेश शितोळे – देशमुख यांनी प्रास्ताविक केले रोटरी क्लबचे मा .अध्यक्ष संजय चौधरी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले
.या कार्यक्रमात जय भवानी पथसंस्थेचे चेअरमन मनोज भोसले , अँड हनुमंतराव जाधव ,दिव्य समाज निर्माण संस्थेच्या सचिव सीमा शितोळे – देशमुख ,व्यसनमुक्ती पुरस्कृते राजेंद्र कदम , राजेंद्र शेलार , सुखदेव शिरसकर , सुधिर लोंखडे , दिपक जाधव ,भरत मोरे , गणेश वाघमारे , मिलिंद मोरे , शंकर जाधव , रियाज मुलानी ,देविदास गुणवरे , आप्पासो ढेंबरे , प्रकाश घोगरे तसेच मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते .
× How can I help you?