आळंदीत पालखी सोहळा आरोग्य दिंडी उत्साहात

आळंदी ( मल्हारभाऊ काळे) : आळंदीतील माऊलींचे पालखीचे प्रस्थान पूर्व संध्ये ला आरोग्य, स्वच्छता जनजागृती अंतर्गत आरोग्य दिंडीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद, पुणे आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय आळंदी येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी या आरोग्य दिंडीत सहभागी झाले होते. आरोग्य दिंडीत चिमुकले वारकरी यांनी विशेष सहभाग नोंदवला

आरोग्य दिंडीमध्ये उष्माघात जणजागरण, हिवताप , डेंग्यु, जणजागरण, क्षयरोग, कुष्ठरोग इत्यादी आरोग्य विषयक जोखमीच्या विषयांची फलकांद्वारे माहिती देण्यात आली. आरोग्य दिंडीचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय आळंदी रुग्ण कल्याण समितीचे संचालक डी. डी .भोसले पाटील यांचे हस्ते झाले.
आरोग्य दिंडीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा नारायण पारखे, ग्रामीण रुग्णालय आळंदीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक सुधाकर म्हाकाळे, ज्ञानेश्वर आढाव ,श्रीमती ज्योती रणदिवे, हिवताप पर्यवेक्षक रेवननाथ ढाकणे, अभिजीत काळे, श्रीमती वैष्णवी देशमाने, श्रीमती. कविता उभे, प्रशांत सोनवणे, हरीश होनावळे, हरीश जाधव आदी आरोग्य विभागाचे कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले.
आळंदी येथील संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर ही दिंडी उत्साहात जनजागृती करीत पार पडली.

Recent Post

× How can I help you?